मुलीचे लग्न माझ्याशिवाय कोणाशी जमवले तर त्याला मी मारून टाकीन…

love-story dhamki

पुणे : मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून आरोपी अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत होता. फिर्यादी महिला व त्यांचे पती हे नातेवाईकांसह थांबले असताना आरोपी तेथे आला. फिर्यादी महिलेच्या मुलीशी मी लग्न करणार आहे. भविष्यात हिचे लग्न जमू देणार नाही, असे आरोपी बोलला. असे का बोलतोस, असा जाब फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपीला विचारला असता ‘तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला मी मारून टाकीन व तुझ्या घरच्यांनाही मारून टाकीन’, अशी धमकी देऊन आरोपीने शिवीगाळ केली

रवींद्र गुलचंद गायकवाड (वय 30, रा. घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 4) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून फिर्यादी यांच्या 17 वर्षीय मुलीचा बऱ्याचवेळा पाठलाग करीत होता.

. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला आणि तुम्हालाही मारून टाकीन’ अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांपासून ते  4 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली.चिखली पोलीस तपास करीत आहेत

Latest News