शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप…


अक्षय बोऱ्हाडे याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान जुन्नर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर 2 वेळा बलात्कार केला आहे.
तर त्याचे मित्र सोनू आणि रोशन (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी या तिघांवर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय याच्यावर यापूर्वीच खंडणी, पत्नीला व कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तो 1 सप्टेंबरपासून पोलिस कोठडीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास एपीआय सचिन शिंदेहे करीत आहेत. जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणुन घेणार्या जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील शिवऋण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिसांनी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान एका तरुणीने अक्षय विरोधात लग्नाचे आमिष दाखवूनबलात्कार (Rape) केल्याचा आरोपकेला आहे. याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालाआहे. जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा HP गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली होती.हे प्रकरण ताजं असतानाच अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नी रुपाली बोऱ्हाडे (Rupali Borhade)
यांनी पतीवर कौटुंबिक छळाचा गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आणखी एका तरुणीने अक्षय विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे अक्षयच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अक्षयने इतर मुलींची फसवणूक केल्याचं वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर आता एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे.