पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपाने वाऱ्यावर सोडलेल्या नगरसेविका आशा शेडगे यांची येरवडा जेल इंट्री

पिंपरी : स्मार्ट सिटी च्या कामाला विरोधी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नगरसेविका आशा तानाजी धायगुडे-शेंडगे, पूजा अरविंद भंडारी (वय-25), शीतल पंकज पिसाळ (वय-21), गौरी कमलाकर राजपाल (वय-31), आशा जैसवाल (वय-40), शीतल महेश जाधव (वय-36), जयश्री रामलिंग सनके (वय-33), संध्या रमेश गवळी (वय-47), स्वप्नील भारत आहेर (वय-21), संजय शंकर पवार (वय-19), संजय शेडगे (वय-45, सर्व रा. कासारवाडी) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत.त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.
कासारवाडीत गणेशोत्सवात रस्ते खोदई केली जात असल्याने रहदारीला अडथळा ठरत असल्याचे सांगत सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी (गुरुवारी) महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या नामफलकावर, कार्यालयात शाई फेकली. भालकर यांच्या अंगावर शाई टाकण्याच्या उद्देशाने नगरसेविका शेंडगे आणि त्यांच्या अन्य समर्थकांनी आपसात कट रचला होता अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली