जुनी सांगवीतील विकासकामाबाबत महापौर व आयुक्तांची आढावा भेट

पिंपरी : जुनी सांगवी परिसरातील सुरु असलेले रस्त्यांची विकास कामे व प्रस्तावित विकासकामांचा पाहणी दौरा करत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी जुनी सांगवीतील विकासकामाबाबत आढावा भेट दिली.येथील प्रस्तावित मधूबन सोसायटी १२ मीटर डी.पी.रस्ता,मुळा रोड १८ मीटर रस्ता,खेळाचे मैदान, सांस्कृतीक केंद्र,सांगवी बोपोडी पुल,पी.डब्ल्यु.डी.मैदानाशेजारील रस्त्यालगत झालेले अतिक्रमण व विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी दौरा करत आढावा भेट दिली.यावेळी महापौर उषा ढोरे,ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे,शारदा सोनवणे सहआयुक्त विजयकुमार थोरात, उपसंचालक नगररचना विभाग प्रभाकर नाळे,सहशहर अभियंता अशोक भालकर,सहशहर अभियंता श्रिकांत सवणे,सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता अनिल राउत,प्रमोद ओंबासे,सुनिल वाघुंडे,जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ-जुनी सांगवी येथील विकास कामाबाबत आढावा भेट देत पाहणी करताना पालिका आयुक्त राजेश पाटील,महापौर उषा ढोरे,ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे व ईतर अधिकारी.