ATM मशीनला डिव्हाईस जोडून पैसे काढणाऱ्या टोळीतील नायजेरीयन महिलेला अटक

पुणे : एटीएम मशीनच्या पाठीमागे अससेल्या नेटवर्क केबलच्या ठिकाणी डिव्हाईस जोडत होते. त्यानंतर एटीएम मशीन हॅक करून त्याचा ताबा घेउन एटीएम कार्ड टाकून एक हजार रूपयांचा आकडा टाकत होते. पण, त्यावेळी मशीनमधून एक हजार ऐवजी 20 हजार रूपये निघत होते. यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा ट्रे रिकामा होत नाही, तोपर्यंत आरोपी पैसे काढत होते आरोपींनी शहरात शिवाजीनगर, मार्केटयार्ड, विमानतळ अशा विविध ठिकाणी एटीएम मशीनला डिव्हाईस लावून पैसे काढले होते.

. या गुन्ह्यातील फरार आरोपी बेनी राजस्थान येथील एका गुन्ह्यात पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक मीनल सुपे यांच्या पथकाने केली. ATM मशीनला डिव्हाईस जोडून मशीनचा ताबा घेत पैसे काढणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या नायजेरीयन महिलेला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.

या महिलेने पुण्यासह विविध शहरात अशा पध्दतीने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. बेनी उर्फ ब्लेसींग उर्फ सॅन्ड्रा नंतोनगो (वय 26, रा. फेज थ्री मेट्रो स्टेशन, गुरूग्राम) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात पूर्वी तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. ते सध्या कारागृहात असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Latest News