*भक्ती-शक्ती प्रेरणा स्थानावर खेळाडू आणि पोलिसांचा सन्मान

*पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या भक्तीशक्ती च्या सावलीत महाराष्ट्र पोलिस दलात प्रसिध्द असणारे खाकी वर्दीतील दर्दी कवी अजय चव्हाण यांची आणि दळवीनगरच्या राहुल पवार सरांच्या कुडो क्लासच्या खेळाडूंची भेट झाली. यावेळी अजय चव्हाण सरांच्या हस्ते हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुडो स्पर्धेत विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतीक चासकर,तेजस सुर्वे, प्रथमेश भोंडवे,आर्या पवार,आर्यन पवार आणि सिद्धार्थ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भक्ती शक्ती या प्रेरणा स्थानावर ६० महिला पोलीस कर्मचारी उपस्तिथ होत्या. अनेक महिला पोलीस आपल्या तान्ह्या बाळाला घरी सोडून आपले कर्तव्य बजावत होत्या. त्यातील पोलीस आणि आई अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा आई-एक कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला
. हा सन्मान कुडो क्लासच्या खेळाडूंनी, श्रीश पवार, अश्विनी पवार, राहुल पवार आणि राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव धनवे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माधव पाटील यांनी सर्व पोलिसांना आपली एक कविता सादर करून दाखवली. यावेळी पोलीस आणि कवी असणारे अजय चव्हाण, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या माहेश्वरी माने आणि रामेश्वर लोहार यांचाही कोरोना योध्या म्हणून सन्मान करण्यात आला.