तीन प्रभाग रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही काळजी करू नका:उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : मुंबई वगळता इतर महापालिकेत तीन प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काँग्रेससह आघाडीतील काही मंत्र्यांनी विरोध केला आहे. या प्रभाग पद्धतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विरोध असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वॉर्ड रचनेबाबत आघाडीत वाद होणार नाही. काही काळजी करू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
. वॉर्ड रचनेबद्दल वाद होणार नाही. काही काळजी करू नका. ज्यांना कोर्टात जायचे ते जाऊ शकतात. यावर येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. कारण आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलीय, असं सांगतानाच पण असल्या विषयात मला रस नाही. मला विकास कामाच्या बाबतीत काय विचारायचे ते विचारा, असले प्रश्न विचारू नका, असं पवार यांनी सांगितलं.
सत्ता काबीज करण्यासाठीच प्रभाग रचना बदलण्यात आल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरेंना काय म्हणायचं ते म्हणू द्या, असं सांगून त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
. राज्यातील महिला अत्याचाराबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ‘शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई-वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे.
70 ते 75 टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडत असतात. त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. .