भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याचं पुढे काय झालं?

पुणे : ( विनय लोंढे )भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याचं पुढे काय झालं?महाराष्ट्रात सन २०१४ साली विधानसभेत भाजपा पहिल्यांदा दमदार जनाधाराने निवडून येण्यामागे जितकी मोदीलाट महत्त्वाची होती

. तितकेच महत्त्वाचे कारण होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारीतील जलसंपदा विभागाने सिंचनावर खर्च झालेल्या ७२ हजार कोटींच्या तथाकथित घोटाळ्याचा आरोप!सिंचन घोटाळ्याचे आरोप सुरु झाले तेव्हा आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन विभागाची श्वेतपत्रिका काढली.

या श्वेतपत्रिकेनुसार सिंचन घोटाळा झाला नसून सिंचनात अनियमितता असल्याचे आढळले. पण विरोधक म्हणून भाजपा हे मान्य करायला तयार नव्हती. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनी सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे घेऊन ‘गाड्या बरोबर नळ्याची जत्रा’ काढली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीतील वाद आणि भ्रष्टाचाराचे आरोप, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र’ ची जाहिरातबाजी यामुळे २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले.केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर २०१४ नंतर सिंचन घोटाळ्यावर काय कारवाई झाली माहीती आहे का?

तर बैलगाडी भरुन पुरावे आहे असं म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांच्या भाजपच्या फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात यु-टर्न घेतला आणि सिंचन घोटाळ्यात ७२ हजार कोटींचा अपहार झाल्याचा आरोप असताना अशा प्रकारच्या अपहाराचा कोणताही अंदाज घेण्यात आला नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सरकाने जुलै २०१८ मध्ये केला.

थोडक्यात सिंचन घोटाळा झालाच नाही म्हणत सिंचनात अनियमितता झाल्याचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केले. या घोटाळ्यात सुरुवातीपासून चर्चेला राहीलेल्या विदर्भ सिंचन विकास महामंडळानेही सुरात सुर मिसळत सन २००१ ते २०११ या आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पासाठी ३०१२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे सांगत ७२ हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह लावले. सिंचन घोटाळा जर झालाच होता तर त्याचा अंदाज घेण्यासाठी सात वर्षे लागतात का? सोमय्या, फडणवीसांनी नक्की कशाचा अभ्यास करण्यासाठी इतका प्रदिर्घ कालावधी घेतला?यावर इतका प्रदीर्घ कालावधी का लागला याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने तत्कालीन फडणवीस सरकारकडे समिती नेमण्याची शिफारस केली

. मात्र फडणवीस सरकारने न्यायालयाच्या या शिफारशीला विरोध दर्शवत धुडकावून लावले. याउपर फडणवीस सरकारने न्यायालयात सांगितले की, ‘तपास समिती नेमल्यास प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खचेल आणि तपासावर परीणाम होईल.’पुढे २०१९ मध्ये ‘एनसीपी सोबत युती नाही! नाही!! नाही!!!’ म्हणणाऱ्या, ‘एकवेळ अविवाहित राहू (सत्तेशिवाय राहू) पण राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा केलेल्या फडणवीसांनी ७९ तासांचे नैतिक सरकार पहाटेच्या ब्रम्हमुहुर्तावर राष्ट्रपती राजवट उठवून स्थापन केले….

आणि त्याचदिवशी दुपारी टिव्हीवर बातम्या सुरु झाल्या… सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एसीबीची क्लीन चिट!शिवाय सिंचन घोटाळ्याचे आरोप करणारे सोमय्या, तावडे कायमचे घरात बसले तर फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येण्याची शक्यता धूसर करुन विरोधी पक्षनेते झाले. सोमय्याची भाजपमधली जागा महाभारतातील शिखंडी सारखी आहे.

Latest News