आंतर-राष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेत पुण्याच्या श्यामराव कलमाडी शाळेची चिन्मया महाजन सातव्या स्थानावर


आंतर-राष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेत पुण्याच्या श्यामराव कलमाडी शाळेची चिन्मया महाजन सातव्या स्थानावर

पुणे — हेरीतास चॅरिटेबल ट्रस्ट व योगरक्षा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन योग स्पर्धा आयोजिल्या होत्या.विविध वयोगटात ८ वर्षे,१० वर्षे,१२वर्षे,१४ वर्षे वयातील गटामध्ये ह्या स्पर्धा आयोजिल्या होत्या.आठ वर्षाखालील स्पर्धेत पुण्याच्या श्यामराव कलमाडी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु चिन्मया उपेंद्र महाजन हिने ७ वा क्रमांक विशेष प्रविण्यासह मिळविला.ह्या स्पर्धेत देश विदेशातून ७४ मुला-मुलींनी भाग घेतला होता.प्रथम दहा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

. चिन्मया हिला योग शिक्षक स्वाती सातपुते ह्या योग प्रशिक्षण देतात चिन्मया ही उत्तम जलतरणपटू असून जलतरण स्पर्धेत अनेक बक्षीसे व पदके, प्रमाणपत्र मिळवली आहेत. जलतरण प्रशिक्षक प्रसाद ढोके ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मया नियमित सराव करते.चिन्मया जिम्नॅस्ट पण असून मिलेनियम स्कूल ऑफ जिम्नॅस्टिकस संस्थेचे आण्वित फाटक,अजित जरंडे,मानसी करमरकर यांचे मार्गदर्शन आहे.श्यामराव कलमाडी प्राथमिक च्या मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ,पर्यवेक्षिका नीता भारती यांनी चिन्मयाच्या ह्या यशाबद्दल अभिनंदन केले

.चिन्मयाचे वडील उपेंद्र महाजन महिंद्रा ट्रॅक्टर्स कंपनी मध्ये उप सरव्यवस्थापक आहेत. चिन्मया च्या ह्या प्रविण्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचें माजी सरव्यवस्थापक पी एन देशपांडे,सौ अरुणा देशपांडे,प्रकाश खेरडे यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला व कौतुक केले.


आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत विशेष प्राविण्य बद्दल चिन्मया महाजन हिचा सत्कार करतांना बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी सरव्यवस्थापक पी एन देशपांडे,सौ अरुणा देशपांडे,प्रकाश खेरडे

Latest News