लांबोटी येथील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे येथील धनंजय गायकवाड व अश्विनी पुजारी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही विवाहित असल्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. अश्विनीचे निराळे वस्ती, सोलापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यात आले होते. ती काही दिवसांपूर्वी माहेरी लोणीकंद, पुणे येथे गेली होती. अज्ञात कारणाने प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री पावणेअकरा वाजता लांबोटी येथील एका लॉजवर घडली. धनंजय बाळू गायकवाड व अश्विनी बिराप्पा पुजारी (दोघे रा. लोणीकंद, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सोमवार, 27 सप्टेंबर रोजी हे प्रेमीयुगुल गुपचूप सोलापूरकडे निघाले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी लांबोटी गावच्या शिवारातील एका लॉजवर मुक्काम केला होता. रात्री 10 वाजता त्यांनी लॉज मालकाला जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी वेटरला पाठवून द्या, असे सांगितले होते.संबंधित बातम्या त्यानुसार रात्री पावणेअकरा वाजता वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांच्या रूमबाहेर येऊन बेल वाजवली. मात्र, दरवाजा आतून बंद असल्यामुळे व त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने त्याने खिडकीतून आत पाहिले असता दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसले.
यासंदर्भात लॉज मालकाने मोहोळ पोलिसांत माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता धनंजय गायकवाड याने ओढणीने, तर अश्विनी पुजारी हिने दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयातील पाठवून दिले. याप्रकरणी दिनेश गाडे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार युसूफ शेख करीत आहेत.