राज्यात महाविकास आघाडी घोटाळेबाज, दगाबाज:आशिष शेलार

पिंपरी : ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला.  तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडूक लागू शकेल. त्याचबरोबर काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं करता येईल, असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे

जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो मैैं नही बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावं, असं म्हणून आशिष शेलार यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. राज्य सरकारामधील तिन्ही पक्षांवर भाजप सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. अशातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर खोचक टीका केली आहे. ते पुण्याच्या मावळ दौऱ्यावर भाजपच्या पदाधिकारी-मेळाव्यामध्ये  बोलत होते

. दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यातील अनेक पक्ष या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष या निवडणुकांसाठी कशापद्धतीची रणनीती आखणार हे आता पाहाव लागणार

Latest News