पहाटे ३.३० वाजता लससाठी सत्याग्रह

पहाटे ३.३० वाजता लससाठी सत्याग्रह


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सलग ७५ तास लसीकरण मोहीम शहराच्या तीन नाट्यगृहात सुरू आहे. नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. काल रात्री चिंचवडच्या धोका कॉलोनीमधील तेजस चौधरी नामक व्यक्ती पहाटे ३ वाजता लस घ्यायला रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आले. पण त्यावेळी इतर कोणीही लस घ्यायला नव्हते. त्यामुळे त्यांच्या एकट्यासाठी दहा लसींचे पॅकेट फोडावे लागणार होते. आणि पुढच्या ३-४ तासात कोणी आले नाही तर बाकीच्या ९ लस वाया जातील असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. अशा परिस्तिथीत काय करायचे याची कल्पना आम्हाला नाही असे कर्मचारी म्हणाले.
कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी जायला सांगितले आणि म्हणाले की सकाळी या आम्ही तुम्हाला लस देतो. हे सर्व राष्ट्रवादीचे पदवीधर शहर अध्यक्ष माधव धनवे पाटील पाहत होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले की हे नागरिक दिव्यांग आहेत आणि आपली मोहीम ७५ तास सलग लसीकरण अशी आहे.
त्यामुळे त्यांना परत पाठवणे चुकीचे होईल. त्यांच्यासाठी नऊ लस वाया गेल्या तरी चालतील कारण लस उपलब्ध असताना ती घ्यायला त्यावेळी इतर कोणी आले नाही त्यात त्यांचा दोष नाही. माधव पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की आज गांधी जयंती आहे, गांधीजी म्हणाले होते की शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. आत्ता या क्षणाला हा माणूस आपल्यासाठी शेवटचा माणूस आहे आणि त्याला लसीपासून वंचित ठेवणे म्हणजे गांधीजींच्या विचारापासून फारकत घेणे होय. माधव पाटील यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आयुक्त राजेश पाटील साहेबांना फोन करण्याची तयारी दर्शवली.काहीही करा पण त्या नागरिकाला लस दिलीच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या नागरिकाला लस द्यायचे मान्य केले. त्यांच्यासाठी दहा लसीचे पॅकेट फोडले आणि त्या नागरिकाला पहाटे ३.३० ला लस दिली गेली.

यावेळी माधव पाटील यांनी महानगरपालिकेच्या
दोडके, जगदाळे , राकेश चाचर आणि इतर कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले.
यावेळी माधव पाटील यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की आज खऱ्या अर्थाने गांधी जयंती साजरी केली.

Latest News