पोलीस फ्रेंड्स असोसिएशन तर्फे मौनी बाबा वृद्धाश्रम येथे मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न

पिंपरी, प्रतिनिधी : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील मौनी बाबा वृद्धाश्रम येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. तनप्रीत कौर मेहता, डॉ. प्रिया खानजोडे, डॉ. ज्ञानदा भिलारे, डॉ. उर्मिला जाट, मोनिका बेदी यांनी ही फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी केली. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, रक्तदाब नियंत्रण, नियमित वैद्यकीय तपासणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मौनीबाबा आश्रमाचे अध्यक्ष व प्रसिद्ध गझल गायक अशोक खोसला, पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे युवाध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंग व आश्रमातील पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन कमलजीत सिंग यांनी केले होते. समाजातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या वृद्धांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. अनेकदा वेळेवर उपचार नसल्याने वृद्धांच्या आरोग्याची परवड होते. वृद्धांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिबिराला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी ज्येष्ठांना तपासून आरोग्याविषयी सल्ला दिला. ज्येष्ठ नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य चिकित्सा करून घेता यावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले होते.