लोणावळ्यातल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

,लोणावळा : पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यातल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात त्यांनी एका पुरुषाला अटक केली आहे. ही व्यक्ती व्हॉटसपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचत होती. पोलिसांनी दिल्ली आणि छत्तीसगढवरुन आणण्यात आलेल्या दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई होती.
लोणावळा आणि परिसरातून एक व्यक्ती काही महिलांचे फोटो आपल्या ग्राहकांना व्हॉटसपवर पाठवतो. शुक्रवारी मध्यरात्री सुरू केलेली ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या व्यक्तीशी व्हॉटसपवरुन संपर्क केला. त्यानंतर आरोपीने सांगितलं की तो लोणावळ्यातल्या वर्सोली भागात महिला उपलब्ध करुन देऊ शकतो. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात जाऊन थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर त्यांना एक गाडी त्यांच्या दिशेने येताना दिसली. गाडीतल्या व्यक्तींच्या प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी राजभर आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं.
पोलिसांच्या गटाने राजभरला अटक केली असून दोन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर प्रवीण मोरे यांनी दिली