*पर्वती मतदार संघ वार्ड क्रं १०२ च्या अध्यक्ष पदी अतुल क्षीरसागर यांची निवड

* पुणे. महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दोऱ्यावर आहेत. महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसेची मोर्चे बांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांच्या आदेशाने आज पुणे शहरात 148 शाखा अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. पक्षाच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या हस्ते या सर्व शाखा अध्यक्षांना नेमणूक पत्र देण्यात आले. यामध्ये पर्वती विधानसभा मधील वॉर्ड क्र.102 मध्ये अतुल क्षीरसागर यांना शाखा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले.नियुक्ती पत्र मा. राज ठाकरे, वसंत मोरे, जयराज लांडगे, योगेश आढाव, विक्रांत अमराळे यांच्या हस्ते देण्यात आले.