त्रिवेणीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

पिंपरी : श्रीकृष्ण मित्र मंडळ व स्वप्निल खोत मित्र परिवार त्रिवेणीनगर. याच्या वतीने स्वर्गीय आनंद शिरहटी यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड ब्लड बँक मार्फत एकूण 84 रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरास सहभाग घेतला. यावेळी शिवसेना शहर संघटक श्री सचिन सानप , पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कु यश साने, युवा नेते निलेश (अण्णा) भालेकर, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे , भाजप युवा नेते पांडुरंग साने, युवा नेते प्रमोद शिंदे, नगरसेविका सौ संगीता ताम्हणे, नगरसेवक प्रवीण भालेकर, शिवसेना नेते रावसाहेब थोरात , प्रवीण पाटील, युवा नेते प्रमोद ताम्हाणे आदी उपस्थित होते यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कृष्णप्रिया महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिर पार पाडण्यास विशेष सहकार्य केले.