धानोरी ते सिंहगड मार्ग Team Sportify running ग्रुप तर्फे पुण्यातील धानोरीस्थित 43 किलोमीटर अंतर अवघ्या चार तासात..

पुणे- (Team Sportify running गृप),टीम स्पोर्टीफाय रनिंग गृप काहीतरी वेगळे करण्याची ईर्षा प्रत्येकाला असते, ह्याच भावनेतून टीम स्पोर्टिफ़ाय रनिंग ग्रूप धानोरी,पुणे नेहमीच अभिनव उपक्रम राबवित असतात. यावर्षी नवरात्रोत्सव काळात sportify रनिंग ग्रुपने सलग नऊ दिवस दररोज ९० मिनिट किंवा ९ किमी रनिंग हे आव्हान स्वीकारले होते व ते यशस्वीरित्या पूर्ण केले. नवरात्र संपल्या नंतर धानोरी ते सिंहगड हे संपूर्ण अंतर ४२.३ किमी फक्त ४ तासात पूर्ण करण्याच् आव्हान ग्रुप ने स्वीकारलं.आणि त्यासाठी ग्रुप चे विजय बन्सोड, दादासाहेब लांडगे, संदीप पाटील, संदीप पनवर, अमित माळी, मंगेश थोरात, आशिष पाथडे, अंकित सिंह, ज्ञानेंद्र पांडे यानी सहभाग घेतला , रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता धानोरी येथील लक्ष्मी नगर सोसायटी पासून ह्या रन ला सुरवात विजय बन्सोड व मंगेश थोरात यानी केली. रेस ठरलेल्या वेळेआधी पुर्ण करण्यासाठी सर्वानी एकच गतिने धावणे गरजेचे होते.
रिले रन चा मार्ग धानोरी- साप्रस पुलिस चौकी – संगमवाडी – जंगली महाराज रोड – नळ स्टॉप – कर्वे पुतळा – वारजे पुल – NDA रोड – खड़कवासला – सिंहगड पायथा – सिंहगड असा होता.
धावपटुना मदत करण्यासाठी ३ सपोर्ट कार मार्गावर तैनात केल्या होत्या.
रिले रन चे सम्पूर्ण संयोजन विजय बन्सोड व संदीप पाटील यानी केले

या रन मधला सर्वात महत्वाचा टप्पा होता सिंहगड पायथा ते सिंहगड, कारण हया ८ किमी च्या अंतरामधे ८०० मीटर चा चढ आहे.जिथे चालताना दमछाक होते तिथ पळायचे होते. सिंहगड पायथ्या पर्यंत ३४ किमी च अंतर जवळ जवळ ३ तासात पूर्ण केल्या नंतर, टीम जवळ जवळ थकली होती, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गड सर करायचाच हे ठरवून रिले पद्धतीने पुर्ण जोर लावला व रेस नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केली.

रेस च्या अनुभवाबद्दल बोलतांना दादासाहेब लांडगे व इतर संयोजक म्हणाले की, “ह्या रेस मूळे आम्ही आयुष्यात एक धडा नक्की शिकलो आणि तो म्हणजे संघ भावना जिवंत असेल तर कुठललेही ध्येय असाध्य नाही, आणि स्पोर्टिफ़ाय च्या संघ भावने मुळेच ही रिले रेस आम्ही ४ तासां ऐवजी ३ तास ४३ मिनिटा मधेच पूर्ण करू शकलो”.

टीम स्पोर्टिफाय (Sportify Running ग्रुप ची स्थापना २०१७ मधे धानोरी येथे रनिंग व फिटनेस बद्दल जनजागृती करण्यासाठी झाली, ग्रुपने गेल्या चार वर्षामधे पुण्यातील धानोरी- लोहगाव विश्रांतवाडी या भागातील शेकडो लोकांना रनिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मोफत दिले आहे, तसेच ग्रुपतर्फे वर्षभर
विविध उपक्रम घेतले जातात व फिटनेस मनोरंजक कसे होईल या कडे लक्ष दिले जाते.
कुणाला ग्रुप जॉइन करायचा असेल तर त्यानी ग्रुप च्या फेसबुक व इंस्टाग्राम पेज वर संपर्क करावा.

हा रन उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीम sportify चे सचिव नितीन राणा,प्रकल्प प्रमुख विजय बनसोड,संदीप पाटील व दादासाहेब लांडगेनी पुढाकार घेतला.

अधिक माहि

Latest News