अदानी मुंद्रा बंदरावर 3000 किलो अंमली पदार्थ मिळाले त्याचं काय झालं?

आर्यन खानला फक्त हिंदू आणि मुस्लीम वादासाठीच अटक करण्यात आली आहे. देशात हिंदू – मुस्लीम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा रोख भाजपवर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. त्यांनी केलेल्या आरोपामुळं या सर्व प्रकरणास आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यात सध्या मुंबईतील कथित क्रुझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचे साथीदार सध्या 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या सर्व प्रकरणावर राजकारण होत आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे. कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही. जे चुकीचं करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3000 किलो अंमली पदार्थ मिळाले त्याचं काय झालं? त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी आणि अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थांवरून लक्ष विचलीत करण्यासाठीच कारवाया केल्या जात आहेत, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे दाल में कुछ काला है, असं वाटतं. शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीनं अटक केली त्या सर्व प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा अत्यंत हीन प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

Latest News