बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीमध्ये टेनिस स्टार लिएंडर पेसनं राजकारणात…

कलकत्ता : तृणमूल काँग्रेसनं माजी खेळाडू आणि चित्रपट कलाकारांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारी हा ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री आहे. टीम इंडियाचा अव्वल टेनिस स्टार लिएंडर पेसनं (Leander Paes) आता राजकारणात सर्विस करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिएंडर तृणमूल काँग्रेस प्रक्षात प्रवेश केला आहे एकूण 18 ग्रँड स्लॅम आणि 1996 साली अटलांटामध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावणाऱ्या लिएंडरचा जन्म कोलकातामधील आहे. लिएंडरचे बंगाली कनेक्शन देखील तृणमूल प्रवेशासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

. बंगालमधील यशानंतर ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीसाठी पक्षाचा मुख्य चेहरा लिएंडर पेस असेल असं मानलं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीमध्ये पेसनं राजकीय इनिंगला सुरूवात केली

.40 सदस्यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचंही गोव्यात चांगलं बस्तान आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशानं आगामी गोवा निवडणूक बहुरंगी होणार आहे. गोव्यातील तरुणाईला तृणमूलकडे आकर्षित करण्याची जबाबदारी

Latest News