दिवाळीच्या तोंडावर गॅस ची दरवाढ

पेघरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत १४.२ किलो वजनाचा विना अनुदानित गॅस सिलिंडर ८९९.५० रुपयांना मिळत आहे. ६ ऑक्टोबर रोजी हे दर वाढवले होते. याआधी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढवले होते.ट्रोल, डिझेल नंतर आता ग्राहकांना सिलिंडर (Cylinder Price) दरवाढीचा फटका बसला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला. ही दरवाढ व्यावसायिक सिलिंडरवर झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही.तेल कंपन्यांनी आज १ नोव्हेंबर रोजी सिलिंडर (Cylinder Price) दरात वाढ केली. यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा (कमर्शियल) दर २ हजार रुपयांवर पोहोचला आहे. याआधी १,७३३ रुपये दर होता. मुंबईत १,६८३ रुपयांना मिळणाऱ्या १९ किलोच्या सिलिंडरसाठी आता १,९५० रुपये मोजावे लागणार आहे. तर कोलकातात १९ किलोच्या सिलिंडरचा दर २,०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईत हा दर २,१३३ रुपयांवर गेला आहे.