आमदार आण्णा बनसोडे यांच्यातर्फे पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या सभासदांना दिवाळी फराळ, अन्नधान्य किट वाटप

आमदार आण्णा बनसोडे यांच्यातर्फे पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या सुमारे 300 सभासदांना सन्मानपूर्वक दिवाळी फराळ, अन्नधान्य किट वाटप

 पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर ।    पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या जवळपास तीनशे सभासदांना पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यातर्फे दिवाळी शुभेच्छा तसेच दिवाळी फराळ व अन्नधान्य किट वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. तसेच कलाक्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कलावंतांचा हृद्य सत्कार रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सन्मानपूर्वक करण्यात आला.

त्यामध्ये ऑर्केस्ट्रा- लोकसंगीत-लोककला क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मोहम्मद रफी, शेख इक्बाल, दरबार, माणिक बजाज, सुबोध चांदवडकर, शंकर जाधव, शशिकांत कोठवळे, रुहि संगमनेरकर, अलका जगताप, शीतल चोपडे, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, शिवांगी शर्मा, उषा करंबळेकर, वर्षा जगताप, जूनियर अमिताभ बच्चन, ज्यू.रजनीकांत, ज्यू. जॉनी लिव्हर, ज्यू. देवानंद तसेच अवसरी दादा या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सचिन काटे यांच्या गोंधळी ग्रुपने केली. त्यामध्ये भक्तिगीते व गोंधळ गीते गायली गेली. त्यानंतर शिल्पा भवार, स्वाती यांनी या ठिकाणी गीते सादर केली. महेंद्र भांबेड यांच्या डान्स ग्रुपने नृत्यकला सादर केली. त्यासोबतच बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम सादर केला. त्यांना अमोल पांढरे गणेश गायकवाड, अमीर शेख आणि अजित कदम यांची साथ मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रसेन भवर,केडी कड,महेंद्र अडसूळ यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विजय उलपे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे आभार मानले की त्यांनी स्वतःहून मला कलाकाराच्या साठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली व दिवाळी फराळ तसेच अन्नधान्य किट वाटपाची जबाबदारी घेतली.

Latest News