पिंपरी-चिंचवड भाजपाची दिवाळीतही ‘ऑडिओ ब्रिज’ द्वारे मोर्चेबांधणी – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा निवडणूक उपक्रम
पिंपरी । प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुखांपासून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑडिओ ब्रिज’द्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीचे निमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शराध्यक्ष महेश लांडगे यांनी एकाच वेळी तब्बल १ हजार ७४० सहकाऱ्यांशी संवाद साधला.दिपावलीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘ऑडिओ बिज’द्वारे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांशी संवाद साधला.संवाद सेतूमध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, बाबू नायर आदी सहभागी झाले.चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात २० मार्च २०२० रोजी पहिला कोविड रुग्ण सापडला. त्यानंतर दीड-वर्षे प्रत्येकाला विविध आव्हानांचा सामना करावा लागला. कोविड विरुद्धच्या लढाईत आता नागरिकांचे दोन डोस पूर्ण होत आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळला आहे. परंतु, आजही अनेक कुटुंबियांची आर्थिक स्थिती अडचणींची आहे. आर्थिकदृष्टया अडचणींत असलेल्या कुटुंबियांनी भाजपा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी मदत करावी. तसेच, फेब्रुवारी होणऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पाटील यांनी केले.*