पिंपरी मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य

पिंपरी : पुण्याजवळील पिंपरी (Pimpri) येथे काही जणांनी एका मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून चार जणांनी मायलेकीला मारहाण करत त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. यामुळे संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसत तिच्या मुलीला घराबाहेर काढून मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित मुलीला शिवीगाळ करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं आहे
. आरोपी याने पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादी महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून, तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी चार आरोपींविरोधात विनयभंग, मारहाण आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.
संबंधित घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या हद्दीत 1 नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
इंदोरी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुलांसोबत घराच्या परिसरात क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळत असताना, फिर्यादी महिलेला बॉल लागला. त्यामुळे फिर्यादी महिलेनं लागलेला बॉल आपल्या ताब्यात घेतला