ST- मंत्रालयासमोर ‘आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य करा…

13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.आज (14 नोव्हेंबर) मुंबई येथील मंत्रालयासमोर काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यावर पोलिसांनी त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.’आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य करा,’ असा आक्रोश त्यांनी केला.’एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मान्य करा. तेव्हाच हा संप आम्ही मागे घेऊ असं एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगितलं जातंय.’मंत्रालयासमोर एसटी कर्मचारी असलेल्या एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विलीनीकरण करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. पण विलीनीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.’हे विलीनीकरण एक दोन दिवसांत करणे शक्य नाही. ही प्रक्रिया किचकट आहे,’ असं परिवहन मंत्री अनिल परब हे वारंवार सांगतायेत.धूर्त लोकांच्या चिथावणीला बळी पडू नका असं आवाहन शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केलं आहे.विलीनीकरणाच्या मागणीबाबत त्यांनी म्हटलं, “वडाची साल पिंपळला लावा अशी मागणी आपण करतोय. होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एस टी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील.”

Latest News