महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वकील पॅनेलवर अॅड. समीर शेख यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वकील पॅनेलवर अॅड. समीर शेख यांची नियुक्ती
पुणे :महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वकील पॅनेलवर पुणे विभागातून अॅड. समीर शेख आणि ऍड. साजीद शेख यांची नियुक्ती झाली आहे. वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनीस शेख यांनी नियुक्तीचे पत्र दिले. ऍड समीर शेख यांची मुंबई उच्च न्यायालय तसेच पुणे विभागासाठी तर ऍड. साजीद शेख यांची पुणे विभागासाठी ही नियुक्ती आहे. वक्फ विषयक खटल्यात ते वक्फ मंडळाची बाजू मांडतील.