भारतीय विद्या भवनमध्ये २० नोव्हेंबर रोजी ‘ध्यायेती योगिनी ‘कार्यक्रम —–

भारतीय विद्या भवनमध्ये २० नोव्हेंबर रोजी ‘ध्यायेती योगिनी ‘कार्यक्रम ——————————–भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत कलासक्त (पुणे) यांच्या ‘ध्यायेती योगिनी’ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
. शनिवारी,२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.या कार्यक्रमांत अलौकिक उर्जा शक्ती असलेल्या ६४ योगीनींचा नृत्याद्वारे घेतलेला शोध सादर केला जाणार आहे.कार्यक्रमाची संहिता रसिका गुमास्ते यांची असून संगीत मॅजिक नोट स्टुडियो यांचे आहे. प्रमद्वरा कित्तूर,रसिका गुमास्ते यांचे निवेदन आहे.
संदीप चौगुले आणि राधिका देशपांडे यांनी संयोजनात विशेष योगदान दिले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०६ वा कार्यक्रम आहे. कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून प्रवेश दिला जाईल …………………..