पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार:उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे म्हाडा च्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 222 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. ही सोडत पारदर्शकपणे राबविण्यात येते. त्यामुळे याचा लाभ सर्वसामान्यांना निश्चितपणे होईल असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडा अंतर्गत 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

अशी असेल घरांची सोडत

म्हाडा गृहनिर्माण योजना : 59 सदनिका
खाजगी बिल्डर 20 टक्क्यांतील घरे : 2945
म्हाडा प्रथम येणार्‍यास प्राधान्य  : 2886

Latest News