पिंपरी चिंचवड शहर प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक करण्यासाठी सर्वांचा सहभाग पाहिजे: उपायुक्त सुभाष इंगळे

पिंपरी : . स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या वतीने सेक्टर नंबर 23 दुर्गा टेकडी येथे सकाळी 7 ते 10 या दरम्यान वृक्षा रोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या वर्ष भरात प्राणी पक्षी व समाजाभिमुख झाडांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येईल असे ही ते म्हणाले. आपले पिंपरी चिंचवड शहर प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग असला पाहिजे. असे मत उपायुक्त सुभाष इंगळे यांनी व्यक्त केले
तसेच हिरामण भुजबळ यांनी सर्व नागरिकांना देशी आणि विदेशी झाडे लावणे आणि त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम, पोलिस नागरिक मित्र, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब ऑफ आकुर्डी, आंघोळी ची गोळी, जलदिंडी इत्यादी सामाजिक संघटनांनी भाग घेतला होता.
या वेळी माजी नगरसदस्य तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य गोविंद पानसरे, वृक्ष प्राधिकरण समितीचे हिरामण भुजबळ, प्राधिकरण पर्यावरण समितीचे प्रमुख सूर्यकांत मुथियान, जलदिंडी चे राजीव भावसार, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, लायन्स क्लब चे विक्रम माने, ॲड. दिलीप निंबारकर, बापूसाहेब काचोळे, कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन चे चुडासमा, माहिती व जनसंपर्क विभागाचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले व मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रमशे भोसले यांनी केले.