एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल – संजय राऊत

मुंबई : एसटी चालक आणि वाहकांना कामावर रूजू होण्यापासून कोणीही अडवू नये. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्याची एसटी महामंडळाला, तर तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची पोलिसांना मुभा असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे.

एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल,” असे संजय राऊत यांनी म्हटलेशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक झाली. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले आहे.

“महाराष्ट्रतले वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागचा हेतू सर्वांना माहीत आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे हे आम्हाला माहीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी कालच्या बैठकीत काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत हे मला समजले,”

.सोमवारी मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एसटी संपाच्या मुद्द्यावरुन बैठक झाली होती. त्यामुळे आता एसटी संपाबाबत शरद पवारांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. मंगळवारी संजय राऊतही शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या दरम्यान, कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, असे केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळ आणि पोलिसांना असेल, असा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

Latest News