भीमाकोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेच्या वतीने 1 कोटी निधी

पुणे : गेली अनेक वर्षांपासून देशभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात. या ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपये निधी देण्यात यावा अशी मागणी स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे यांनी केली होती.स्थायीसमितीचे अध्यक्ष हेमंत रासने व इतर सदस्यांनी महत्वपूर्ण ठराव मंजूर केला

. या ऐतिहासिक ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूलभूत तसेच विकासाची कामे करता येणार आहेत.पुणे शहरालगत असणाऱ्या कोरेगाव भीमा या ठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. या ठिकाणी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली होती.त्यामुळे या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

Latest News