‘तूटेपर्यंत ताणू नका रे राजांनो,’ ST हे गोरगरिबांच्या प्रवासाचं साधन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

पुणे :: आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून ‘तूटेपर्यंत ताणू नका रे राजांनो,’ असं आवाहन केलं आहे.अनिल परब यांनी सकाळीच एसटी कर्मचाऱ्यांसमोर अंतरीम पगारवाढीची ऑफर ठेवण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर कदाचित कर्मचारी संप मागे घेतील, अशी शक्यता आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दिलेला अहवाल उच्च न्यायालयात (Supreme Court) जमा केल्यानंतर यावर निर्णय होईल. मात्र तोपर्यंत एसटी बंद राहू नयेत, यासाठी अंतरीम पगारवाढीवर विचार केला जात आहे

अजित पवार एसटी कर्मचाऱ्यांना म्हणाले, ‘एसटी हे गोरगरिबांच्या प्रवासाचं साधन आहे. त्यांची ही सुविधा हिरावून घेऊ नका. मुुख्यमंत्री तुमच्या मागण्यांवर मदत करीत आहेत. पण आम्हाला हेच हवे, तेच हवे, असं म्हणत तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’, असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे

. पुढे ते म्हणाले, ‘यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे यावे, सरकार दोन पावले पुढे येईल,’ असं देखील त्यांनी सुचवलं आहे.अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, ‘इतर राज्याप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना फायदा देण्याचा आमचाही प्रयत्न आहे. पण नेमकी चर्चा करायची कुणाशी? हाही एक प्रश्न आहे. कारण संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी नको तर आमच्याशीच चर्चा करा, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे

. त्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे यावे. यातून आपण काहीतरी मार्ग काढू’, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अंतरीम पगारवाढीची ऑफर राज्य सरकारने दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत संप मागे घ्यावा यासाठी सरकारने हा तोडगा काढला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे.

.

Latest News