पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचारी महासंघातील पदाधिकारी यांना कामगार न्यायालयात जाण्यास परवानगी

पिंपरी :​पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक दिनांक ११/०१/२०१९ रोजी पार पडली. सदर निवडणुकीमध्ये निवडुन आलेल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ हा घटनेप्रमाणे एक वर्षाचा होता. एक वर्षाचा कार्यकाळ संपला असताना देखील नव्याने निवडणुक घेणे क्रमप्राप्त होते

. परंतु कोरोना महामारीचे कारण पुढे देवुन कसल्याही प्रकारची निवडणुक न घेता बेकायदेशीरपणे वार्षिक सर्वसाधारण सभा घेवुन कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णया संदर्भात जुन्या कर्मचारी महासंघातील श्री. मनोज माछरे, श्री. नितीन समगीर, श्री. विशाल भुजबळ, श्री. उमेश बांदल व श्री. तुषार कस्पटे यांनी कामगार आयुक्त यांचेकडे अपील केली आहे.त्यामुळे त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचारी महासंघातील पदाधिकारी यांना कामगार न्यायालयात जाण्यास परवानगी दिली आहे

कामगार आयुक्तांनी जुन्या कर्मचारी महासंघातील पदाधिकारी कर्मचारी यांना कामगार न्यायालयात जाण्यास परवानगी दिली.प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना संघटनेच्या नव्याने निवडुन आलेल्या कार्यकारीणीने निवडणुक घेण्यास आज दिनांक २९/११/२०२१ रोजी मान्य केले आहे व निवडणुक निर्णय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मुख्य लिपीक श्री. तुकाराम जाधव यांची नियुक्ती करणेकामी दोन्ही पक्षाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
​संघटनेच्या सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कार्यकारीणीने दिनांक १६/१२/२०२१ पर्यंत संघटनेची मतदार यादी प्रसिद्ध करुन निवडणुक प्रकीया राबविण्याचे कामगार न्यायालयासमोर मान्य केले आहे

. सदर निवडणुक कार्यक्रम नियुक्त केलेल्या निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिनांक १६/१२/२०२१ पुर्वी जाहीर न केल्यास मे. कामगार न्यायालयामार्फत योग्य ती पुढील कायदेशीर करावी अशी मागणी त्यांनी केली

Latest News