लोक जनशक्ती पार्टीचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, पुणे, पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार

पुणे : रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त्त पुणे जनसंपर्क कार्यालय, साधू वासवानी चौक येथे रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.पुणे, पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचा निर्धार करण्यात आला.या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर पुणेकर, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के सी पवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पुणे शहर व जिल्ह्ा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

खा.चिराग पासवान , प्रदेशाध्यक्ष शमीम हवा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्याची शपथ घेण्यात आली.शरद टेमगिरे, सुमेध बोधी, कन्हेय्या पाटोळे, कल्पना जगताप, नेहा दोरके, संतोष पिल्ले, विनोद धिवार, संजय चव्हाण, मिलिंद राजगुरु, राजू कुऱ्हाडे, संतोष वायदंडे, रंजित सोनावळे, सचिन फुलपगार, राहुल कुलकर्णि, आदिनाथ भाकरे, आतीष सोनवणे, राजेश साळवे, राजेश पिवाल, योगिता साळवे, निर्मला त्रिभुवन, कुसुम दाहिरे, अप्पा पाटील, बंडू वाघमारे, गणेश भोसले, राहुल उभे, राहुल शेळके, बुद्ध भुषण उपस्थित होते. प्रारंभी क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Latest News