भाजपला पराभूत करायच असेल तर सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजचे…

. मुंबई ;. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आहेत. आज मुंबईतच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांशी संवाद साधला.यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देशात भाजपला पराभूत करायच असेल तर सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजचे आहे. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष एकवटले तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणं सोपे आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
तुम्हाला सातत्याने रस्त्यावर उतरुन भाजपविरोधात लढावे लागेल. तुम्ही असे केले नाही तर हा पक्षच तुम्हाला बाहेर काढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगलामध्ये सर्व काही सुरळीत सुरु असतानाही मला बाहेर पडावे लागले. यापुढे अन्य प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी राजस्थानच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केलं आहे.
त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तृणमूल काँग्रेसला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे. तसेच, २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधायला त्यांनी सुरूवात केल्याचा तर्क त्यांच्या भेटीगाठींवरून लावला जात आहे.