नवीन सुधारित लीजच्या नोटिसा पाठवणार, लिजधारकांपुढे बोर्ड प्रशासन अखेर नमले…


खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये आलेल्या अवास्तव लीज (भाडे) लीजधारकांना नोटिसा मिळाल्या होत्या, मात्र या लिस्टच्या हिशोबात चूक झाली असल्याचे बोर्डाचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रमोद कुमार सिंग यांनी कबूल केले. नवीन सुधारित लीज नोटिसा लीजधारकांना पाठविण्यात येणार आहे. लिजधारकांना नवीन सुधारित लीजच्या नोटिसा मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
बोर्डाच्या हद्दीमध्ये लीजधारकांना प्रशासनाकडून अव्वाच्या सव्वा लीस आकारण्यात आले होते. लीजधारकांनी आक्षेप नोंदवित भाजपाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना याबाबत निवेदन दिल। आमदार शिरोळे यांनी सीईओ सिंग यांच्यासोबत लीज धारकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लीजधारकांनी तसेच आमदार शिरोळे यांनी लीज बाबत प्रश्न उपस्थित केले.
लीजधारकांना पाठविण्यात आलेल्या लीज मध्ये मोठ्या प्रमाणावर चुकी झाली असल्याचे सीईओ सिंग यांनी मान्य केले. लवकरच सुधारित नोटिसा लीजधारकांना पाठविण्यात येणार आहे. ज्या लीजधारकांनी लीज चे पैसे भरले असून हिशेबाप्रमाणे जास्त पैसे भरल्यास त्यांना परत देण्यात येणार असल्याचे आश्वासन सीईओ सिंह यांनी दिले आहे. बैठकीत याप्रसंगी दीपक अग्रवाल, अॅड. सुनील अग्रवाल, डॉ. मालोजी गादेवार, राजेश अग्रवाल उपस्थित होते.