वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार…
शहरातील सेफसिटी कॅमेर्यांमध्ये वाहतूक नियम मोडणार्यांचे फोटो घेतले जातात. मोबाईलवर बोलणारे, एकेरी मार्गाचे उल्लंघन, ट्रिपल सीट, सिग्नल जंप असे प्रकार यामध्ये फोटोसह येत असल्याने वाहनधारक याला नकारच देऊ शकत नाहीत.संबंधित बातम्याराज्यभरात ई-चलन प्रणाली 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दंडाची रक्कम भरण्यास पैसे नसल्यास तो दंड अनपेड म्हणून संबंधित वाहनधारकाच्या नावावर थकीत राहतो. तीन वर्षांत अशा दंडाची रक्कम तब्बल 10 कोटींच्या घरात गेली आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे (सुधारित) नवीन दराने दंडाची आकारणी होणार असून, ही वाढ दुप्पट ते चौपट करण्यात आली आहे. विनालायसेन्स वाहन चालविणार्यांना आता चक्क 5 हजारांची दंडाची पावती फाडली जाणार आहे. तसेच दंड न भरल्यास न्यायालयीन खटलेही दाखल होणार आहेत. शहर वाहतूक शाखेनेही या दंडाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे
नियमांचे उल्लंघन जुना दंड सुधारित दंड
लायसेन्स नसताना वाहन चालविणे 500 5,000
सीटबेल्टचा वापर न करणे 200 500
ट्रिपल सीट 200 1,000
चुकीच्या दिशेने वाहन चालविणे 1,000 न्यायालयात खटला
कर्कश व्हॉर्नचा वापर 200 1,000
पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणे 200 500
काचेवर फिल्मिंग 200 500
मद्य प्राशन करून वाहन चालविणे न्यायालयात खटला
वेगमर्यादेचे उल्लंघन 1,000 2,000
लायसेन्स जवळ न बाळगणे 200 500
विम्याशिवाय वाहन चालविणे 2,000 2,000
नो पार्किंग 200 न्यायालयात खटला
खराब नंबर प्लेट 200 500
सिग्नल तोडणे 200 500
वाहनात मोठ्या आवाजात स्पीकर लावणे 200 500