चिंचवड बांधकाम कामगारांच्या मुलांना उबदार कानटोप्यांचे वाटप


चिंचवड बांधकाम कामगारांच्या मुलांना उबदार कानटोप्यांचे वाटप
हवामान बदलामुळे शहरात कधी पाऊस तर कधी थंडी पडत आहे. या हवामान बदलाचा फटका सर्वात अधिक गरिबांना बसतो. त्यातच बांधकाम मजूर आणि कामगाराच्या मुलांकडे ऊन, पाऊस आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेशी संसाधने नसतात. म्हणूनच
अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उबदार कानटोप्यांचे वाटप केले. रावेत येथी ‘मस्ती की पाठशाळा’ या शाळेत ६० मुलांना कानटोप्यांचे वाटप करण्यात आले. बऱ्याच मुलांना अशा कानटोप्या पहिल्यांदाच मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला.
यावेळी अंघोळीची गोळीचे सदस्य सचिन काळभोर,किशोर कोंढाळकर,राहुल धनवे, वंदना पेडणेकर, प्रतिभा कांबळे आदी उपस्तिथ होते.
यावेळी आंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी मुलांसोबत गप्पा गोष्टी केल्या. पाटील यांनी ‘मस्ती की पाठशाळा’ च्या संचालिका प्राजक्ता रुद्रावर यांचे आभार मानले.