‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ विषयावर परिषद

‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ विषयावर परिषद

१६ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजन

पुणे :
​’कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ ​या ​विषयावर ​’तालानोआ डायलॉग’ ही गोलमेज परिषद पुण्यात ​​१६ डिसेंबर रोजी​ दुपारी एक ते पाच या वेळात ​ ​होत आहे.समुचित एन्व्हायरो टेक,लया रिसोर्स सेंटर,इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज,सीसीपी एन्व्हायरोमेंटल फाउंडेशन ​ ​आयोजित ही परिषद सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज (सीडीएसए) चांदणी चौक,पुणे येथे होणार आहे.संस्थांचे प्रतिनिधी,तज्ज्ञ असे २० जण या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत.’तालानोआ’ हा फिजी शब्द असून सर्वंकष,सर्वसमावेशक आणि पारदर्शक संवादासाठी तो वापरला जातो.या परिषदेला त्या हेतूनेच ‘तालानोआ डायलॉग’ असे संबोधण्यात आले आहे.

Latest News