माहुल प्रदूषणग्रस्तांच्या लढयास इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा पाठिंबा

माहुल प्रदूषणग्रस्तांच्या लढयास
इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा पाठिंबा

पुणे :

चेंबूर जवळच्या माहुल प्रदूषणग्रस्तांच्या लढयास इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने पाठिंबा दिला आहे. १७ रासायनिक कारखान्यांमुळे येथील नागरिकांना दूषीत पाणी,दूषीत हवा, यामुळे अर्धांगवायू, त्वचारोग याचा सामना करावा लागत आहे. अनेक जण मृत्यूच्या दारात आहेत.

ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासमवेत असलम इसाक बागवान यांनी माहुलमध्ये प्रदूषणग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतल्या. आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली. यावेळी जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या मंचाच्या रेखा गाडेकर, पौर्णिमा आणि सहकारी उपस्थित होते.

Latest News