एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब दयावा. डॉ. भारती चव्हाण


एस. टी. महामंडळाचे विलीनीकरण करा…..डॉ. भारती चव्हाण
एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब दयावा. डॉ. भारती चव्हाण
पिंपरी: एस. टी. कर्मचा-यांच्या संपास गुणवंत कामगार कल्याण मंडळ आणि मानिनी फाऊंडेशनचा पाठिंबा पिंपरी (दि. 15 डिसेंबर-2021) विविध मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर पासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरु आहे. या कर्मचा-यांच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी Stade गुणवंत कामगार कल्याण मंडळ आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केली आहे.
एस. टी. महामंडळाचे संचालक, अष्ट अधिकारी, ठेकेदार आणि दलाल यांचा महामंडळाच्या राज्यभर असणा-या लाखो कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आणि पाच हजार एकरांहून जास्त असणा-या जमिनीवर डोळा आहे. एस. टी. महामंडळ कायम तोट्यात असल्याचे व्यवस्थापन सांगते. महामंडळातील भ्रष्ट अधिकारी, व्यवस्थापन हे एस. टी. चे खासगीकरण करून कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी अनुकूल आहे. परंतु एस. टी. च्या पुरवठादारांवर कारवाईचे धाडस दाखवत नाहीत. अधिकारी व पुढारी संगनमताने फायद्यात चालणारे मार्ग शिवशाही, शिवनेरीच्या पुरवठादारांना आंदण म्हणून देत आहे
. एस. टी. ने सरासरी रोज 65 लाख प्रवाशी प्रवास करतात. तर मागील सात वर्षापासून प्रत्येक प्रवाशी तिकीटामागे एक रुपया अधिभार लावण्यात आला आहे. 1992 सालापासून प्रत्येक कर्मचा यांच्या वेतनातून दरमहा 45 रुपये मृत्यू फंड म्हणून कपात केली जाते. एस. ला लागणा-या डिझेलवर राज्य सरकार प्रतिलिटर 35 रुपये कर आकारते. तसेच प्रत्येक प्रवाशांच्या तिकीटावर 17.5 टक्के प्रवाशी कर आकारला जातो. या व्यतिरिक्त प्रत्येक वाहनांमागे दरवर्षी व्यावयायिक वाहन कर आकारला जातो. या विविध करातून जमा होणा-या लाखो कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा अशीही मागणी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी यावेळी केली.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ. एस. टी. कर्मचारी पिपरी चिंचवड आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 15 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे उपाध्यक्ष तानाजी एकोडे राज अहिरराव, भरत शिंदे, संजय गोळे आपणा जोगदंड, गोरक्ष वाघमारे, कल्पना माईगडे, महादेव धर्मे, बशीर मुलाणी, प्रकाश शिंदे तसेच बल्लभनगर आगार एस.टी. कामगारांचे प्रतिनिधी ओमप्रकाश गिरी, पविण मोहिते, भारत नाईक, अश्विनी गायकवाड, नीलम कदम, अनुराधा वीरकर, ज्योती शिंदे, योगेश शिंदे, अविनाश शेंडगे, बापू जाधव, विजय साबळे आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन राज्यातील प्रवासाना सेवा देण्याऐवजी ठेकेदार आणि पुढा-यांच्या बंगलबच्याना पोसण्याची सेवा करीत आहे. कोणाचीही मागणी नसताना एस. टी. मध्ये 150 कोटी रुपये खर्च करून वायफाय सुविधा बसवली त्याची आता काय अवस्था आहे ? निकृष्ठ दर्जाचे गणवेश कर्मचा-यांना देण्यासाठी 100 कोटी रुपयाहन आस्त न्दरवर्षी खर्च केला जातो. 24 हजार रुपयांना मिळणारी ट्रायमॅक्स मशिन टैंडर बेसिसवर भाड्याने घेतली चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले की, 8 नोव्हेंबर पासून सुरू असणाऱ्या या मध्ये ए एस टी च्या हजाराहून जास्त कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. मागील दोन वर्षात 53 हुन जास्त कर्मचा-यांनी आत्महत् केल्या आहेत. या कर्मचा-यांप्रती सांत्वन करण्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब है मेस्मा लागू करण्या धमकी देत आहेत. या धमकीला घाबरून आजपर्यंत पाच टक्केही कामगार कामावर रुजू झाले नाहीत तर हजाराहून जास्त कामगारावर व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. औरंगाबादसह अनेक विश्व अधिका-यांनी या कामगारांना चौकशीच्या नोटीसा बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. या कामगारा मानसिक दडपण वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. आता सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आ राज्यातील जनतेला देखिल वेठीस धरु नये अशीही मागणी डॉ भारती चव्हाण यांनी केली.