‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद

‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद

‘कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता ‘ : परिषदेतील चर्चेचा सूर

पुणे :

​’कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ ​या ​विषयावर ​’तालानोआ डायलॉग’ ही गोलमेज परिषद पुण्यात ​​१६ डिसेंबर रोजी​ दुपारी एक ते पाच या वेळात ​ ​ पार पडली.समुचित एन्व्हायरो टेक,लया रिसोर्स सेंटर,इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज,सीसीपी एन्व्हायरोमेंटल फाउंडेशन ​ ​आयोजित, सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज (सीडीएसए) चांदणी चौक,पुणे येथे झालेल्या या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध संस्थांचे प्रतिनिधी,तज्ज्ञ असे २० जण या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, कालमर्यादा डोळयासमोर ठेवावी, असा परिषदेतील चर्चेचा सूर होता.

.’तालानोआ’ हा फिजी शब्द असून सर्वंकष,सर्वसमावेशक आणि पारदर्शक संवादासाठी तो वापरला जातो.या परिषदेला त्या हेतूनेच ‘तालानोआ डायलॉग’ असे संबोधण्यात आले होते.

डॉ. अनीता बेनिंजर, सुजीत पटवर्धन, डॉ. अमिताव मलिक ,डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, डॉ.विनीता आपटे, डॉ.पूर्वा केसकर, शैलजा देशपांडे, अनीता काणे ,पौर्णिमा आगरकर, आदिती काळे इत्यादी सहभागी झाले.

पुणे मेट्रोपॉलिटन रिजन हा कार्बन न्यूट्रल करण्यासाठी ‘ क्लायमेट कलेक्टीव्ह पुणे ‘ नावाने तयार झालेल्या थिंक टँकने तयार केलेल्या रोडमॅप नियोजनावर परिषदेत चर्चा करण्यात आली.

पौर्णिमा आगरकर यांनी तालानोवा डायलॉग नावामागील पार्श्र्वभूमी सांगीतली.आदिती काळे यांनी २०३० पर्यंत पुणे कार्बन न्यूट्रल करण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचे सादरीकरण केले. कार्बन उत्सर्जन कमी करणे, त्याचे दुष्परिणाम कमी करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी सांगीतले.

डॉ. प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या, ‘ जागतिक हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्पपरिणामांचे मोजमाप ( कार्बन व्हलनरॅलिटी मॅपिंग ) केले पाहिजे. कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल, धोक्याबद्दल नव्या पिढीला जागृत केले पाहिजे.
सरकार आणि यंत्रणा पर्यावरण संवर्धनासाठी काय करतील , हा महत्वाचा मुद्दा असला तरी आपल्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे पाहिले पाहिजे ‘.

डॉ. अनीता बेनिंजर म्हणाल्या, ‘ पुणे परिसरातील बांधकामांचा वेग पाहता जमिनीवरील, सुविधांवरील , पाणीसाठ्यांवरील वाढता ताण लक्षात घेतला पाहिजे. लोकसंख्येच्या घनतेच्या नियंत्रणाचा विचार केला पाहिजे. लॅंड युज पॉलिसी बदलल्याशिवाय पर्यावरणाचा तोल सांभाळता येणार नाही.

सुजीत पटवर्धन म्हणाले, ‘ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे. इलेक्ट्रिक वाहनांवर त्यासाठी फार अवलंबून राहता येणार नाही.

अमिताव मलिक म्हणाले, ‘ पर्यावरणात अचानक होणाऱ्या बदलाचे परिणाम आपण अनुभवत आहोत. कार्बन न्यूट्रॅलिटी शिवाय पुढील मानवी प्रगती शक्य नाही , हे लक्षात घेतले पाहिजे ‘.

नद्यांची दुरवस्था आणि त्यांच्या दुष्परिणामांकडे शैलजा देशपांडे यांनी लक्ष वेधले.

डॉ.पूर्वा केसकर यांनी बांधकाम व्यावसायिक आणि विकसनसंबंधित सर्व घटकांमध्ये जागरूकता वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले
—————-

Latest News