प्रभागरचना जाहीर केल्यानंतर तो कसा आहे हे समजेल- आयुक्त राजेश पाटील

पुणे: प्रभागरचना अद्याप सर्वांच्या समोर आलेली नाही. त्यापूर्वी त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर सर्व चित्र समोर येईल.तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणुका मुदतीमध्ये म्हणजे 13 मार्च 2022 पूर्वी होणार का, प्रश्नावर त्यांनी काही सांगता येत नाही, असे सांगितले. चार सदस्यीय प्रभागरचना फोडून त्रिसदस्यीय प्रभागरचना केली आहे. नवीन 11 नगरसेवकांची भर पडली आहे. एकूण 139 नगरसेवकांच्या 46 प्रभागांसाठी संपूर्ण नव्याने रचना केल्याने पूर्वीचे सर्व प्रभाग फुटले आहेत
.प्रभागरचनेचा आराखडा मी व काही ठराविक अधिकार्यांनी तयार केला आहे. त्यामुळे यंदा तो फुटला नाही. आयोगाने प्रभागरचना जाहीर केल्यानंतर तो कसा आहे हे समजेल.त्यापूर्वी त्याबाबत आरोप करणे योग्य नाही, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले..
एकूण 139 नगरसेवकांचा 46 प्रभागांचा आराखडा 6 डिसेंबरला सादर करण्यात आला. त्यावर शनिवारी (दि.11) निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्यासमोर आयुक्त राजेश पाटील यांनी सादरीकरण केले
.सोमवारी (दि.13) काही त्रुटींबाबत पालिकेच्या अधिकार्यांनी आयोगास माहिती दिली.आयोगाने आराखडा स्वीकारला आहे.त्या आराखड्यात काही बदल करणार की आहे तसा मंजूर केला जाणार, आराखडा जाहीर करून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर केला जाणार यांची उत्सुकता लागली आहे
तसेच, काही अफवांचे पीक उठले असून, त्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेतपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे. तो आराखडा जाहीर करून पुढील प्रक्रिया कधी सुरू केली जाते,
फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीची प्रभागरचना जाहीर होण्यापूर्वीच सार्वजनिक झाली होती.मात्र, नैसर्गिक सीमा व लोकसंख्येचे गट न फोडता व नियमांनुसार प्रभागरचना केली आहे. त्यामुळे सर्व 46 प्रभागांची रचना व सीमा या नवीन आहेत, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.