अनधिकृत फ्लेक्स, किजोक्स स्वखर्चाने काढण्यास परवानगी द्या: माजी स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड़ यांची आयुक्तांकडे मागणी


प्रभागातील अनधिकृत फ्लेक्स, किजोक्स स्वखर्चाने काढण्यास परवानगी मिळावी: माजी स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड़ यांची मागणी
पिंपरी: प्रभाग क्र २६ वाकड-पिंपळे निलख येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, किओक्स लावण्यात येतात व पोलवरून अनधिकृत इंटरनेट केबल्स देखील टाकण्यात येतात याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हटविण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी केलेली आहे.
या अनधिकृत लावलेल्या फ्लेक्स, किओक्स, पोलवरील इंटरनेट केबल्समुळे अपघात देखील झालेले आहेत. कारणामुळे प्रभागातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.प्रभागातील अनधिकृत फ्लेक्स, किजोक्स स्वखर्चाने काढण्यास परवानगी मिळावी: अशी मागणी महापालिका आयूक्त राजेश पाटिल यांच्याकडे माजी स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड़ यांनी केली
महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येते परंतु कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदरील रस्ते हे पूर्णपणे पुन्हा अनधिकृत फ्लेक्स व किओक्सने उजळतात व पुन्हा महानगरपालिकेच्या कारवाई करीता ५-६ महिने प्रतीक्षा करावी लागते.त्यामुळे नागरिकांच्या हिताकरिता प्रभाग क्र २६ वाकड पिंपळे निलख मधील पिंक सिटी रस्ता, काळेवाडी फाटा ते मानकर चौक रस्ता छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता दत्त मंदिर रस्ता या रस्त्यांवरील अनधिकृत फ्लेक्स, किओक्स व पोलवरील अनधिकृत इंटरनेट केबल्स स्वतः वैयक्तिक पातळीवर स्वखर्चाने काढण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महापालिका आयूक्त राजेश पाटिल यांच्याकडे माजी स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड़ यांनी केली आहे
नगरसेविका गायकवाड म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक २६मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, किओक्स लावण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत इंटरनेट केबल्सचेही मोठे जाळे आहे. ते हटविण्यासंदर्भात प्रभागातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येतात. महापालिकेकडूनही एखादी कारवाई होते. मात्र कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा परिस्थिती जैसे थे असते. त्याकडे ५-६ महिने महापालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो.
सिटी रस्ता, काळेवाडी फाटा ते मानकर चौक रस्ता, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता दत्त मंदिर रस्ता या ठिकाणी असलेल्या अनधिकृत फ्लेक्स, किओक्स व अनधिकृत इंटरनेट केबल्स स्वखर्चातून काढण्याची आपली तयारी असून यासंदर्भात आपण लवकरात लवकर परवानगी द्यावी. अशी मागणी नगरसेविका गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, सदर मागणीनंतर तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग येणार का? आणि प्रभाग क्रमांक २६ अनधिकृत फ्लेक्समुक्त होणार का? हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.