पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात

02

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात
– नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले आयोजन
– कार्यक्रमास हजारो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित
पिंपरी । प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिना निमित्त नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘अटल पुरस्कार व सत्कार सन्मान सोहळ्याचे चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदीरा शेजारील देऊळमळा पटांगणाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्वप्रथम भाजपा स्थापनेपासूनचे पिंपरी चिंचवड शहराचे सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे प्रथम अध्यक्ष डाॅ.बाळकृष्ण नाईक, डाॅ. प्रतिभाताई लोखंडे, मामंचंदजी अग्रवाल, दादाराम ढवाण यांना महापौर उषा उर्फ माई ढोरे व पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते ‘अटल कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आणीबाणी व मिसा मध्ये अटक झालेले कार्यकर्ते आणीबाणी सुधीर केसकर, बाळासाहेब मोकाशी, सतीश बोरकर, मोहन गुपचूप, कांता जाधव यांसह
स्व.गणेश देव, स्व.निवृत्तीभाऊ राऊत, स्व.रमण मुणगेकर, स्व.शरदराव नाटेकर, स्व.मधुकरराव जोशी, स्व. गोपाळ ताम्हणकर यांचा मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना व चिंचवडमध्ये  ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवले व पक्षाचा विस्तार केला असे जेष्ठ भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते मधुजी जोशी, पै.ज्ञानेश्वर शेडगे, विमलताई जोशी, सुरेश गदिया, दिपक कुलकर्णी, विजय संपगावकर, गतीराम भोईर, कांताताई मोंढे, ॲड. सुभाष चिंचवडे, रविंद्र देशपांडे, उदय कवी, रविंद्र प्रभुणे, मिलींद भुर्के, सतीश वीपट, वसंतराव गुजर, नितीन उर्फ नंदू भोगले, मिलींद कुलकर्णी यांना भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते  ‘अटल कार्यकर्ता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना कालखंडात खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या विश्व हिंदू परीषद, बजरंग दल, श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, नव तरुण मंडळ, चिंचवडचा राज श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, पागेची तालीम मित्र मंडळ, श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ, अखिल चिंचवड मंडई मित्र मंडळ, क्रांतीवीर भगतसिंग मित्र मंडळ, श्री लक्ष्मी विनायक प्रतिष्ठान, प्रयास ग्रुप महिलांचं खुलं व्यासपीठ, रौद्र शंभो युवा प्रतिष्ठान, ग्राम रक्षक दल चिंचवड पोलीस स्टेशन या संस्थांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते ‘अटल सेवा पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
चिंचवडच्या जडणघडणीत मोलाचा वाचा असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा आमदार महेशदादा लांडगे, भाजपा महीला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा उत्साहात- नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले आयोजन- कार्यक्रमास हजारो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होोते

Latest News