पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

पुणे :

पुणे महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ‘तर्फे प्राथमिक शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी निवेदन देण्यात आले.

महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारून शहरातील अधिकाधिक विद्यार्थी मनपा शाळेत प्रवेश घेतील यासाठी उपाययोजना कराव्यात , शाळेत कौशल्य प्रणालीचा वापर करून व्यवसाय अभिमुख प्रशिक्षण दिले जावे , पालक- शिक्षक संघटना मजबूत करून पालकांचे मत शैक्षणिक क्षेत्रात कसे घेता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली. ‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप’ तर्फे असलम इसाक बागवान, सचिन आल्हाट, अब्दुल बागवान, इब्राहिम खान गफूर सय्यद उपस्थित होते.

पालिकांच्या शाळांत गुणवत्ता वाढीचा आग्रह राष्ट्रीय जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय ( एन ए पी एम), राष्ट्र सेवादल, स्वराज अभियान तसेच इतर समविचारी पुरोगामी संस्थानीहि धरला असून इतर संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांनीदेखील पुढाकार घ्यावा, असे इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी सांगितले. येत्या सोमवारी शिष्ट मंडळाशी शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत बैठक ठरली असून असलम इसाक बागवान, सुभाष वारे ,मुकंद किर्दत, सुनिती सु.र., इब्राहिम खान,संतोष म्हस्के सहभागी होणार आहेत .
……

Latest News