कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !

पुणे. :.


कोरेगाव भिमा विजयस्तंभ-शौर्यदिन, समाज कल्याण विभागाची जय्यत तयारी !
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विविध समित्याच्या माध्यमातुन समन्वय साधला जाणार.

पुणे :- पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन निमित्त अभिवादन कार्यक्रम होत आहे.  शासन पातळीवर प्रथमच हा कार्यक्रम होत असुन त्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याकरिता शासन निर्णयाद्वारे समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नियंत्रणाखाली तात्पुरती प्रशासकीय समिती गठित केली आहे. सदर समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. सदर कार्यक्रम हा पुणे विभागात संपन्न होत आहे. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग पुणे श्री.बाळासाहेब सोळंकी हे प्रशासकीय समितीचे सदस्य सचिव असुन त्यांनी शासनाच्या इत्तर विभागाच्या नोडल अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. त्यात पुणे विभागातील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी असे एकुण ७१ जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संनियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती-पुणे, राजशिष्टाचार समिती- भिमा कोरेगाव, नियत्रण कक्ष-पुणे, नियत्रण कक्ष-भिमा कोरेगाव, दि ३१ डिसे रात्री होण-या कार्यक्रमासाठी नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, प्रचार व प्रसिध्दी समिती आदि समित्याद्वारे नियोजन करण्यात येत आहे.
समितीतील अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्रम संबधातील जबाबदारी व कारावयाचे कामकाज याबाबत आज रोजी ऑनलाईन बैठीकी द्वारे प्रादेशिक उपायुक्त श्री बाळासाहेब सोळंकी यांनी आढावा घेऊन निर्देश दिलेत. सदर कार्यक्रम नियोजनबध्द व उत्कृष्टरित्या संपन्न करावयाचा असुन कोणतीही त्रृटी राहणार नाही, तसेच .कार्यक्रमाचे नियोजन करताना प्रत्येकाने कोव्हिड् १९ च्या पार्श्वभुमीवर सर्व खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश श्री सोळंकी यानी दिले


स्थानिक स्तरावर पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ.बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षन संस्था (बार्टी) पुणे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे, महावितरण कंपनी, माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडुन एकमेकांच्या समन्वयाने कार्यकर्माचे नियोजन करण्यात येत आहे.

            

).


Latest News