अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली असती, पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नव्हता : अजित पवार

पुणे::‘आम्ही काही प्रमुख लोकं पुन्हा राज्यपाल महोदयांची भेट घेऊ. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यात काय घटनाबाह्य आहे, हे आम्हीही समजून घेऊ. हातात आणखी दोन महिने आहेत. आम्ही घटना तज्ज्ञांचाहीसल्ला घेऊ’ असे पवार यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे बहुमत असतानाही आम्ही टोकाची भूमिका घेतली नाही. आम्हाला त्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली असती, पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. ते महत्त्वाचं पद आहे. सर्वांनीत्या पदाचा आदर केलाच पाहिजे. राज्यपाल महोदयांनी काही घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत.
पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल हे सरकारने आधीच जाहीर केले आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. अध्यक्षपदावरून झालेल्या टीका टिप्पणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राज्य सरकारने समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता’, अशी टीका केली होती त्याकडे लक्ष वेधले असता, ‘राज्यपाल महोदयांनी सांगूनही निवडणूक घेतली असती, तर तो असमजूतदार पणा झाला असता…पण आता काहीजणांना हे कळत नसेल तर…’ अशा शब्दात त्यांनी टोला लागावला. ‘आम्ही पुन्हा राज्यपालांना भेटून सांगू, त्यांनीही माहिती घ्यावी. आम्हालाही त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं आहे’, असे पवार म्हणाले.
.