कोरेगाव भिमा – शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम , प्रशासकिय यंत्रणा सज्ज ,समाज कल्याण आयुक्ताकडुन कोव्हिड् पाश्वभुमीवर नियमांचे पालन करण्याचे आवाहन !


कोरेगाव भिमा – शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम , प्रशासकिय यंत्रणा सज्ज ,
समाज कल्याण आयुक्ताकडुन पाहणी , कोव्हिड् १९ च्या पाश्वभुमीवर नियमांचे पालन करण्याचे आवाहन !
सामाजिक न्याय मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार .
पुणे (दि.३०/१२/२०२१) शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात राज्य शासनाने प्रथमच नियोजन करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे, सदर कार्यक्र्मासाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाली आहे.सदर कार्यक्रमासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री श्री धंनजय मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व शासकिय यत्रणाची तयारी पुर्ण झाली आहे. समाज कल्याण आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करुन कोव्हिड् १९ च्या पाश्वभुमीवर सर्व नियमांचे पालन काटेकोर पणे व्हावे यासाठी खबरदारी घेण्याचे सुचित केले आहे. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या गृह विभागाने दि २९ रोजी परिपत्रकद्वारे सुचना निर्गमित केल्या आहेत. त्या सर्व सुचनाचे पालन करण्यासाठी सर्व विभागांकडुन काळजी घेण्यात येत आहे. येणा-या सर्व अनुयायी यांनी प्रशासनास सह्कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उद्या दि ३१ रोजी रात्री १२ वाजता फटक्यांची आतिशबाजी, त्यानंतर सामुदायिक बुध्द वंदना, दि १ जानेवारी रोजी पहाटे १ ते ५ वाजेपर्यत धम्मयाचना, सकाळी भारतीय बौध्द महासभा सामुदायिक बुध्द वंदना, दि १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मान्यवराकडुन अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानतर समता सैनिकदल,महार बटालयीन सेवानिवृत्त सैनिक , आर्मी इ.यांची सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे.सकाळी ८ वाजेनंतर सर्व अनुयायी यांना अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभ खुले असणार आहे.