आयएमईडीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२२’


आयएमईडीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील
‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२२’
१० जानेवारी रोजी आयोजन,स्पर्धेचे नववे वर्ष
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२२’ चे दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.
या स्पर्धेचे नववें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास सहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन :डॉ. पतंगराव कदम’, ‘’, ‘ नवीन शिक्षण धोरणाची विद्यार्थी दृष्टीकोणातून अंमलबजावणी ‘, ‘ महिला सक्षमीकरण -भारताच्या विकासाची गुरुकिल्ली’, ‘ शिक्षकांपुढील साथीच्या रोगानंतरची आव्हाने’, ‘ संकटसमयी सर्जनशीलता आणि नावीन्य ‘, ‘ हास्य -सर्वोत्तम औषध ‘, ‘ स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘, ‘ शिक्षणात अध्यात्माची गरज ‘ , ‘ तरुणांमध्ये फ्रिप्टो चलनाची लोकप्रियता ‘, अभिव्यक्ती स्वातंत्र्य : वरदान की शाप ‘ ‘हे स्पर्धेचे विषय आहेत.
या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ प्रमोद पवार, डॉ सचिन आयरेकर, डॉ विजय फाळके, डॉ.हेमा मिरजी, डॉ. सोनाली खुर्जेकर, डॉ. श्रध्दा वेर्णेकर प्रतिमा गुंड यांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क नाही.