पुणे शहरात विदयार्थ्यां साठी 40 ठिकाणी लसीकरण होणार : महापौर मोहोळ

पुणे: दुसरीकडे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात 40 ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करावी का? तसंच शाळा पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात का? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय..

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुण्यात आज 399 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अलर्ट झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ () यांनी सोमवारी, 3 जानेवारी रोजी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Latest News